Home Pimpri देहूरोड येथे पतीने पत्नी व तिच्या प्रियकराचा केला खून आरोपी गजाआड
पिंपरी -चिंचवड २५ जून – आताच हाती एक खळबळजनक अपडेट ही पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्ताल्या अंतर्गत असणाऱ्या देहूरोड पोलिस स्टेशनच्या हद्दीतून आली आहे. पुणे शहर तसेच पिंपरी चिंचवड भागात दिवसां दिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये चांगलीच वाढ झाली आहे, आयटी पार्क परिसरातील डाऊन टाऊन हॉटेलच्या मागे एक महिला व पुरुषाचा मृतदेह आढळला आहे, सदर घटनेबाबत देहुरोड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विवाहबाह्य संबंधांमुळे पतीनेच पत्नी व तिचा प्रियकराचा खून केला आहे ,असा आरोप पतीवर असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे, त्याचे नाव दत्तात्रय साबळे असं आहे. त्यांने मंगला टेंभरे (वय ३०)व जगन्नाथ सरोदे (वय ५५) यांचा खून केला आहे, दरम्यान या प्रकरणी पुढील तपास देहूरोड पोलिस करीत आहेत,