देहूरोड येथील घोरावडेश्वर डोंगरावर वृक्षारोपण

0
363

पिंपरी, दि. ८ (पीसीबी) – स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ, निसर्ग मित्र विभागाच्या वतीने हरित घोरावडेश्वर प्रकल्पात डोंगरावर वृक्षारोपण करण्यात आले. स्थानिक प्रजातींची कहाडळ, पुत्रंजिवा, कुंकुफळ, बकुळ, हळदकुंकू, रुद्राक्ष, शमी आदि दुर्मिळ झाडे यावेळी यावेळी लावण्यात आली. यावेळी गायत्रीमंत्राचे सामुदायिक पठण करण्यात आले.

थरमॅक्स ग्लोबल या कंफनीच्या वाकडेवाडी येथील कार्पोरेट ऑफिसच्या सुजाता देशपांडे यांच्यासह पर्यावरण विभागाचे 40 अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. स्वातंत्र्याचा सावकर मंडळाचे भास्कर रिकामे यांनी उपस्थित सर्वांचे स्वागत केले. निसर्ग मित्र विभागाचे अध्यक्ष धनंजय शेडबाळे यांनी सह्याद्री मधील वनसंपदेची माहिती दिली, त्याबरोबरच दुर्मिळ प्रजातींची लागवड व संवर्धन घोरावडेश्वर डोंगरावर करीत असल्याचे सांगितले.

दिपक पंडीत यांच्या मार्गदर्शनाखाली सामुदायिक पर्यावरण रक्षण प्रतिज्ञा घेण्यात आली. सचिव विजय देशपांडे , दिपक नलावडे, प्रशांत नाईकवडे, भुषण पाचपांडे , सुखदा गायकवाड आदिंनी वृक्षारोपण कार्यक्रमाचे नियोजन केले. सध्या आठवड्यातून तिन दिवस म्हणजेच गुरुवार, शनिवार व रविवार सकाळी डोंगरावर निसर्ग मित्र विभाग निसर्ग सेवा करीत असुन जास्तीत जास्त पर्यावरण प्रेमींनी सहभागी व्हावे असे आवाहन मंडळाने केले आहे.