देहूरोड पोलीस ठाण्यातच दोन गटात तुंबळ हाणामारी

0
140
crime

देहूरोड, दि. 16 ऑगस्ट (पीसीबी)
परस्पर विरोधी तक्रारी दाखल केल्यानंतर दोन गटात पोली ठाण्याच्या आवारातच पुन्हा हाणामारी झाली. ही घटना गुरुवारी (दि. 15) सायंकाळी पावणे सात वाजताच्या सुमारास देहूरोड पोलीस ठाण्याच्या आवाराज घडली.

अमर ब्रम्हदेव कसबे (वय 38), प्रेम ब्रम्हदेव कसबे (वय 43), आशिष नागेश वाघमारे (वय 24), विकास रामकृष्ण साठे (वय 28) आणि चार महिला आरोपी (सर्व रा. देहूगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस अंमलदार राहूस अर्जुन वाघमारे यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार व विरोधक हे दोघेही पोलीस ठाण्यात आल्यावर त्यांचे परस्पर विरोधी गुन्हे दाखल केले. तसेच दोन्ही बाजूंकडील व्यक्तींना शांतता राखण्याबाबत समज दिली. मात्र पोलीस ठाण्याच्या इमारतीतून बाहेर पडल्यावर पुन्हा त्यांच्यात हाणामारी झाली. सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी आठ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.