देहूगावात ४७ हजारांची घरफोडी

0
229

देहूगाव, दि. १२ (पीसीबी) – देहूगावात तीन चोरटयांनी चोरी करून रोख रक्कम आणि दागिने असा ४७ हजारांचा ऐवज चोरला. त्यातील एका चोरट्याला पोलिसांनी अटक केली आहे. हे घटना सोमवारी (दि. ११) मध्यरात्री दोन वाजता घडली.

विक्की उर्फ कुणाल कमल मांझी (वय २८, रा. दिघी. मूळ रा. पश्चिम बंगाल) आणि त्याच्या दोन साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहार. याप्रकरणी तुकाराम गोविंद विरणक (वय ५०, रा. देहूगाव) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे घर कुलूप लावून बंद असताना चोरट्यांनी घराची कडी, कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातून रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असा एकूण ४७ हजारांचा ऐवज चोरून नेला. दरम्यान नागरिकांनी एका चोरट्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.