देहुरोड येथे एकाच वेळी दोन घरात घरफोडी

0
182

देहूरोड, दि. ६ (पीसीबी) – देहुरोड येथे दोन फ्लॅटमध्ये घरफोडी झाली आहे. ज्यामध्ये 64 हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे. ही घरफोडी 3 ते 5 फेब्रुवारी या कालावधीत देहुरोड येथील दत्तनगर व जवळ असलेल्या आदर्शनगर येथे झाली आहे.

याप्रकरणी पवन वासुदेव शिवणकर (वय 35 रा.देहुरोड) यांनी फिर्याद दिली असून अज्ञात इसमाविरोधात गुन्हाा दाखल केला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे भाऊ रहात असलेला फ्लॅट व त्यांच्याा जवळच राहणाऱ्या अंकुश गरगडे यांचे घर बंद असताना आरोपीने घराचा कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश करत घरातील सोन्या चांदीचे दागिने, रोक रक्कम असा एकूण 64 हजार 200 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. देहुरोड पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.