पिंपरी, दि. १५ (पीसीबी) – देशी बनावटीच्या पिस्तुलासह एका तरुणाला राहटणी येथून अटक करण्यात आली आहे. ही कारवाई गुरुवारी (दि.14)दुपारी जगताप डेरी चौकात खंडणी विरोधी पथकाने केली आहे.
असलम अहमद शेख (वय 32 रा. थेरगाव) असे अटक आरोपीचे नाव आहे.याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात खंडणी विरोधी पथकाचे पोलीस नाईक गणेश गिरी गोसावी यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खंडणी विरोधी पथकाला शस्त्रासह एक जण जगताप डेरी चौकात थांबल्याची खबर मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. त्याची अंग झडती घेतली असता त्याच्याकडून देशी बनावटीचे असलेले 50 हजार रुपयांचे एक पिस्टल पोलिसांनी जप्त केले. आरोपी विरोधात वाकड पोलीस ठाण्यात बेकायदेशीर रीत्या शस्त्र बाळगल्याचा गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.










































