देशाला महासत्ता करण्यासाठी ग्रामीण विकास होणे गरजेचे – भास्कर पेरे पाटील

0
403

स्वामी विवेकानंद प्रतिष्ठानच्या पुरस्काराचे वितरण

पिंपरी, दि. १४ – सरपंच हा ग्रामपंचायतीचा मुख्य कणा आहे. सरपंच पद हे विठ्ठला पेक्षा काकणभर वरचढ असून ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ग्रामीण विकास करणे सरपंचाला शक्य आहे.देशाला महासत्ता करण्यासाठी ग्रामीण भागाचा विकास होणे गरजेचे आहे.
असे मत आदर्श सरपंच भास्कर पेरे पाटील ‘आपली आपणच करा सोडवणूक’ या विषयावर बोलताना व्यक्त केले.

चिखली शरद नगर येथील स्वामी विवेकानंद यांच्या 160 व्या जयंतीनिमित्त, स्वामी विवेकानंद लोकसेवा प्रतिष्ठानच्या वतीने स्वामी विवेकानंद युवा पुरस्कार महेश निंबाळकर यांना, भक्त पुंडलिक पुरस्कार कोल्हापूरचे माजी महापौर सागर चव्हाण यांना,तर जीवनगौरव पुरस्कार बंडोपंत ज्ञानदेव कोटकर यांना प्रदान करण्यात आला.

यावेळी आमदार महेश लांडगे,नवी मुंबईचे उपयुक्त नितीन काळे ,नायब तहसीलदार प्रवीण ढमाले, माजी नगरसेवक एकनाथ पवार,सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, सुनील लोखंडे, व्याख्यानमाला समन्वय समितीचे अध्यक्ष राजाभाऊ गोलांडे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष रामराजे बेंबडे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी सागरभाई चव्हाण यांनी स्वामी विवेकानंद प्रतिष्ठानला ५१ हजाराचा निधी दिला.
श्री.पेरे पुढे म्हणाले कि, सरपंच किंवा नगरसेवकांनी जर स्वच्छ पाणी,शिक्षण,आरोग्य,ज्येष्ठांचा सांभाळ करणे,वृक्षारोपण,स्वच्छता, निर्भेळ खाद्यपदार्थ या बाबींवर काम केल्यास नागरीकांचा सर्वांगीण विकास तर होईल. शिवाय नागरीकांचे आयुर्मान वाढेल.

जपानमध्ये आजही १०० वर्षांचे नागरीक कष्ट करतात आपल्याकडे ६० व्या वर्षीच मृत्यू येतो. आपले आयुर्मान कमी होण्यास कारणीभूत नेतेच आहे. आपले उरलेले ४० वय सरपंच आणि नगरसेवकांनी खाल्लेत. याला राजकारण्यांसह शिक्षक,पत्रकार,धर्मगुरू देखील जबाबदार आहे. यांनी आपली जबाबदारी झटकत समाजाला चुकीचा संदेश दिला.

जनतेतून सरपंच निवडावा यासाठी आम्ही पाठपुरावा करून फडणवीस सरकारला हा कायदा करण्यास भाग पाडले मात्र महाविकास आघाडीच्या काळात अजित पवार यांचे नाव न घेता पिंपरी चिंचवडकरांनी हा बंद केला. असा टोला लगावला.

आमदार लांडगे म्हणाले कि,व्याख्यानमालेच्या माध्यमातून चांगला विचार समाजात पेरला जातो.व्याख्यानमालेची आवड तरुणांमध्ये निर्माण झाली पाहिजेत. कारण यशस्वी होण्यासाठी जिद्द,चिकाटी सोबतच चांगले विचार उपयुक्त ठरतील. असे मत त्यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे रामराजे बेंबडे यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन अविनाश आवटे तर आभार मिलिंद वेल्हाळ यांनी मानले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संतोष ठाकुर, महेश मांडवकर ,देवीदास आडींगे,बापूराव साळुंखे,शंकर बनकर ,महेंद्र माकोडे , पी.टी म्हस्के , विक्की ठाकूर ,अशोक हाडके,श्रेणिक पंडित यांनी विशेष परिश्रम घेतले.