देशात न्यायव्यवस्था असेल तर विजय आमचाच- जयंत पाटील

0
310

 पिंपरी दि.२६ (पीसीबी) -सरकार निवडणुकांना घाबरत आहे.लवकर निवडणुका व्हाव्यात म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पिंपरी चिंचवड मध्ये सत्तेवर येईल असं जयंत पाटील आज पत्रकार परिषदेत बोलत होते लोक संधीसाधू असतात वेगळ्या पक्षात जाण्याची संधी ते शोधतात सध्या राष्ट्रवादीकडे सत्ता नसल्याने हळू कल होत आहेत सत्ता अल्यावर नक्कीच विकास होईल अस आश्वासन देखील त्यांनी यावेळी दिले.

पुण्यात पीएफआय म्हणजे पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया संघटनेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्या प्रकरणी आंदोलन करण्यात आलं. यावेळी पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्या होत्या अशा घोषणा देत असतील तर ते अतिशय गंभीर असून सरकार च लक्ष महाराष्ट्रात नाही त्यामुळे लोक धजावले असा आरोप त्यांनी केला त्यावर खरच त्यांनी दाखल घ्यावी. असेही ते म्हणालेत.भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला टार्गेट केलं कारण त्यांना राष्ट्रवादीची भीती जास्त वाटते असा टोला देखील त्यांनी यावेळी लगावलाय.वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प तळेगाव येथून गुजरातला गेला मात्र तळेगाव हेच ठिकाण योग्य होत असा दावा देखील जयंत पाटील यांनी केला वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पासाठी महाराष्ट्र सरकारने चांगली ऑफर देऊनही प्रकल्प तिकडे गेला इथे महाराष्ट्राचं नुकसान झाल्याचं ही त्यांनी सांगितलं .

देशात अजूनही न्याय व्यवस्था शिल्लक असेल तर विजय आमचा च होईल अस मत त्यांनी व्यक्त केलं तसेच माझा एकनाथ खडसे वर विश्वास आहे ते आमच्या च सोबत आहेत विरोधक बोलतात त्यावर विश्वास नसल्याचं ही त्यांनी स्पष्ट केलं.शिंदे सरकार कोसळणार च आणि पुन्हा महविकास आघाडीची सत्ता येणार . असे जयंत पाटील म्हणाले. तानाजी सावंत यांनी मराठा समजावr जे वक्तव्य केलं त्याने तमाम मराठी. लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या. मराठी लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या असून मराठा समाजातून रोष व्यक्त होत आहे असेही ते म्हणाले.