देशातील स्त्रियांमध्ये आत्मभान निर्माण करण्याचे काम सावित्रीबाईंनी केले – ॲड लक्ष्मण रानवडे

0
144

पिंपरी, दि. ०३ (पीसीबी) – पिंपरीतील महात्मा फुले स्मारक येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मराठा सेवा संघाचे वतीने अभिवादन करण्यात आले. या वेळी झालेल्या कार्यक्रमात मराठा सेवा संघाचे पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष ॲड. लक्ष्मण रानवडे म्हणाले की, वर्षानुवर्षे महिलांना अधिकार नाकारण्यात आले होते. व स्त्रियांना अत्यंत प्रतिकूल व हलाखीची, मानहानीची वागणूक मिळत होती. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंनी समाजाचा प्रखर विरोध, कुचेष्ठा व टिका सहन करून स्त्रियांच्या उध्दारासाठी व हक्कासाठी त्यांनी पुण्यात महिलांसाठी भिडेवाडा येथे पहिली शाळा चालू केली. व पीडित शोषित महिलांना त्यांच्या विकासाचा मार्ग प्रशस्त केला . त्यांच्या या प्रयत्नाने देशातील त्यांच्या लेकी, मुख्यमंत्री, पंतप्रधान, राष्ट्रपती, शास्त्रज्ञ, वकील, इंजीनिअर, डॉक्टर, प्राध्यापक अशा विविध पदांवर काम करत असून त्यांनी प्रगतेची विविध दालने पार केली आहे. व त्या पुरुषांबरोबर खेळ व संरक्षण दला सहित खांद्याला खांदा लावून देशाच्या प्रगतीमध्ये हातभार लावत आहे.

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी क्रांतिकारक पाऊल उचलून लावलेल्या शिक्षणाच्या रोपट्याचा वटवृक्ष झाल्याचे दिसत आहे. असे ॲड. लक्ष्मण रानवडे म्हणाले. या कार्यक्रमास ज्येष्ठ नागरिक संघाचे सचिव सुरेश इंगळे , सुभाष देसाई , मराठा सेवा संघाचे सचिव सचिन दाभाडे , ॲड. सुनील रानवडे , दिलीप वाघ व इतर कार्यकर्ते उपस्थित होते .