देशवीराप्रती नतमस्तक होण्याची, अभिवादन करण्याची संधी आपल्या प्रत्येकाला मिळाली – शत्रुघ्न काटे

0
338

पिंपरी,दि.१७(पीसीबी) – अण्णासाहेब मगर प्राथमिक शाळेमध्ये ‘मेरी मिट्टी मेरा देश’या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नगरसेवक शत्रुघ्न काटे हे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमानिमित्त विविध वेशभूषामध्ये शाळेतील विद्यार्थ्यांची प्रभात फेरी काढण्यात आली.

या वेळी नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी सांगितले कि, “मेरी मिट्टी मेरा देश” या अभियानाच्या माध्यमातून देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या, सर्वस्व गमावलेल्या, बलिदान दिलेल्या त्या सर्व ज्ञात,अज्ञात देशवीराप्रती नतमस्तक होण्याची, अभिवादन करण्याची संधी आपल्या प्रत्येकाला मिळाली आहे. स्वातंत्र्य सैनिकांचे बलिदान व्यर्थ जाऊ न देता त्यापासून प्रेरणा घेऊन देशाच्या प्रगतीसाठी प्रयत्न करण्यासाठी प्रत्यके भारतीयाला उद्युक्त करणारा हा उपक्रम आहे.

या कार्यक्रमानिमित्ताने स्वातंत्र्य संग्रामात सहभाग घेऊन देशाला पारतंत्र्यातून मुक्त केलेल्या स्वातंत्र्य सैनिक मेजर जनरल एस व्ही चिन्नावार ,कर्नल आशिमकुमार रवींद्रचंद्र दत्ता यांचा सत्कार करून सन्मानित करण्यात आले. यावेळी वॉर्ड शिक्षण समिती अध्यक्ष सौ.शीतल कदम, मुख्याध्यापिका सौ.सुरेखा जोशी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.