देवेंद्र फडणवीस हे नव्या युगातील जनरल डायर…; रोहित पवारांची खोचक टीका

0
46

मुंबई, दि. 06 (पीसीबी) : देवेंद्र फडणवीस अभिमन्यू आहेत का नाही आहेत? हे मला माहित नाही. मात्र या नव्या युगातले ते जनरल डायर मात्र नक्की आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांना फोन करून जालन्यातील उपोषण करणाऱ्यांवर लाठीचार्ज करायला सांगितला. वारकरी संप्रदायाच्या लोकांना सुद्धा यांनी सोडलेले नाही. त्यामुळे अतिशय चुकीच्या प्रवृत्तीचे हे लोक आहेत. त्यामुळे महायुतीचे नेत्यांना आपल्याला धडा शिकवायचा आहे, असं रोहित पवार म्हणाले. जळगाव जिल्ह्यातील जामनेर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची सभा झाली. या सभेत रोहित पवार बोलत होते.

जामनेरमधील महाविकास आघाडीचे उमेदवार दिलीप खोडपे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत रोहित पवार यांनी गिरीश महाजन यांच्यावर निशाणा साधला आहे. गिरीश महाजन आमदार झाले मंत्री झाले मात्र मंत्री झाल्यानंतर त्यांनी तुमच्यासाठी काय केलं? मोठ मोठी खाती त्यांच्याकडे होती. जलसंपदा खात त्यांच्याकडे होतं. मतदारसंघ शेतकऱ्यांसाठी सुजलाम सुफलाम झाला असता. काय विकास केला त्यांनी? काल-परवा मी एक व्हीडिओ बघितला, दुचाकीवर बसले होते पण चिखलातून त्यांना जाता आलं नाही. एखाद्या नेत्याचे जर अशी परिस्थिती असेल तर सर्वसामान्यांचे काय?, असा सवाल रोहित पवार यांनी केला.

आरोग्यामध्ये मोठं काम केल्याचं ते नेहमी सांगतात. मात्र आरोग्याची सेवा देण्यासाठी बाहेर का घेऊन जातात? याच ठिकाणी असे एखादी मोठा हॉस्पिटल का तयार झालं नाही? महाजन हे संकट मोचक नेते आहेत असं म्हणतात. मात्र संकट कोणाचं सोडवतात, तर देवेंद्र फडणवीस यांच्यावर संकट आलं तर ते संकट सोडवतात. संकट मोचक नेते आहे. तुमचं वजन आहे. मग का म्हणून शेतकऱ्यांना अनुदान आलं नाही? सर्वसामान्यांच्या शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी तुमची वजन का वापरत नाही? हा माझा प्रश्न आहे, असं रोहित पवार म्हणाले.

तुमच्या तालुक्यामध्ये गिरीश भाऊंनी काही उद्योग आणले का? डिग्री घेऊन तरुणांच्या हाताला काम नाही. सरकार महाराष्ट्र आयोगाच्या परीक्षांमध्ये सुद्धा मोठ्या भ्रष्टाचार करतात तलाठी भरतीसाठी तर एकेक जणांकडून 35 35 लाख रुपये घेतले. देवेंद्र फडणवीस यांना मागच्या दरवाजातून कॉन्ट्रॅक्ट भरती केली.. 27 हजार कॉन्टॅक्टमध्ये भरती केली कोणाला दिला तर आपल्या भाजपच्या लाडक्या आमदाराला… गोडाऊन भरून भरून पैसा ठेवलेला आहे आणि हा पैसा आपल्या उमेदवाराच्या विरोधात निवडणुकीमध्ये वापरला जाऊ शकता. कितीही पैसा आला तरी आपल्या लाडक्या उमेदवाराच्या पाठीशी उभे राहून तुम्हाला विजय करायचा आहे, असं म्हणत फडणवीसांवर रोहित पवारांनी निशाणा साधला आहे.