देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शत्रुघ्न काटेंकडून वृक्षारोपण

0
368

पिंपळे सौदागर, दि. २२ जुलै (पीसीबी) – महाराष्ट्र राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब व श्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी पिंपळे सौदागर रहाटणी येथील शिवछत्रपती लिनियर अर्बन गार्डन, कोकणे चौक परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम घेऊन सामाजिक बांधिलकी जपली . या वृक्षारोपनाचा फायदा काही काळानंतर वाटसरूणा तर होइलच तसेच परिसरातील सौंदर्यात देखील भर पढ़ेल . पावसाचे होणारे कमी प्रमाण लक्षात घेता येणारा काळ हा चिंताजनक आहे यासाठी आपण आज वृक्षारोपण करणे गरजेचे आहे नाहीतर भविष्यात  भावी पिढीसाठी जीवन जगणे आव्हानात्मक होईल . वाढती वाहतूक आणि त्यामधून होणारे प्रदुषण यापासून आपले संरक्षण या हरित वृक्षामुळेच  होते .

येत्या पुढील काही दिवसात प्रभागामध्ये जास्तीत जास्त ठिकाणी वृक्षारोपण करण्याचे ध्येय नगरसेवक शत्रुघ्न (बापु) काटे यांनी घेतले आहे तसेच वृक्षारोपण कार्यक्रमाला प्रोत्साहन देण्यासाठी लोकांना वृक्षांपासून होणाऱ्या विविध फायद्याबाबत जाणीव करून देऊन वृक्ष लागवडीसाठी प्रवृत्त करणे गरजेचे आहे असे मत व्यक्त केले . 

उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी आवाहन केले होते कि त्यांच्या वाढदिवसानिमित्त समाजपयोगी उपक्रम राबवावे जेणेकरून सर्वसामान्य नागरिकांना त्या उपक्रमाचा लाभ मिळाला पाहिजे आणि या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी आपल्या प्रभाग क्र २८ मध्ये वृक्षारोपण करून या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिला .  
यावेळी  नव चैतन्य हास्य क्लब सभासद , कोकणे चौक जेष्ठ नागरिक संघ सभासद ,आनंद हास्य क्लब सभासद ,ऑल सिनिअर सिटीझन असोसिएशनचे सभासद  आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.