देवेंद्र फडणवीस यांनी पुण्याचे पालकमंत्री होऊन पिंपरी चिंचवड शहराकडे लक्ष द्यावे – माधव पाटील

0
19

दि. 5 (पीसीबी) – पिंपरी चिंचवड शहरात एकही सांगण्यासारखा उपक्रम झाला नाही. तसेच भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नावरही प्रशासन आणि राजकारणी शांत आहे.
म्हणूनच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चंद्र पवार पक्षाचे मुख्य प्रवक्ते माधव पाटील यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले.
ते म्हणतात की सुप्रियाताई सुळे म्हणाल्या की सध्या राजकारणात फक्त आपण ऍक्टिव्ह मोडमध्ये आहात. त्याचप्रमाणे गडचिरोलीला भेट देऊन तिथल्या बांधवांच्या समस्यांना तुम्ही उत्तरे शोधणार आहात.
आमच्याही पिंपरी चिंचवड शहराकडे आपण लक्ष द्यावे ही विनंती केली. माधव पाटील म्हणतात की महानगरपालिकेचे नागरिकांचे प्रश्न सोडवण्याकडे लक्ष नाही. त्यात कुत्र्यांच्या निर्बीजीकरणात झालेला भ्रष्टाचार. या सर्वांवर श्वेतपत्रिका काढावी कारण पिंपरी चिंचवड चा प्रत्येक ना सामान्य नागरिक कुत्र्यांच्या भीतीमुळे जीव मुठीत घेऊन जगत आहे. त्यामुळेच फडणवीस यांनी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री व्हावे.त्यामुळे पिंपरी चिंचवड शहराचे प्रश्न सुटतील असे आम्हाला वाटते.
म्हणूनच तीस लाख पिंपरी चिंचवडच्या नागरिकांची विनंती तुम्हाला पत्राद्वारे सांगत आहे.
तसेच
भटक्या कुत्र्यांचा प्रश्न वेळोवेळी उपस्थित करणाऱ्या पत्रकारांचा सन्मान मुख्यमंत्र्यांनी करावा. तसेच या पत्राद्वारे माधव पाटील यांनी पिंपरी चिंचवडचे आयुक्त यांचा राजीनामा तात्काळ घ्यावा अशी मागणी केली.