मुंबई, दि. 05 (पीसीबी) : भाजपा, एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी या तीन पक्षाच्या महायुतीनं विधानसभा निवडणूकीत विरोधकांचा दारूण पराभव केला. आणि आज ५ डिसेंबर रोजी मुंबईतील आझाद मैदानावर महायुती सरकारचा शपथविधी कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमासाठी जय्यत तयारी सुरू आहे.
तसंच देशभरातील मान्यवरांना, राजकीय नेत्यांना, सेलिब्रिटींना खास आमंत्रण देण्यात आलं आहे. पण लक्षवेधी बाब म्हणजे या शपथविधीसाठी देवेंद्र फडणवीस आणि महायुतीच्या नेत्यांसाठी खास संत तुकाराम महाराज केशर पगडी तयार करण्यात आली आहे. या विशेष पगडीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.










































