देवेंद्र फडणवीस यांचा राजकीय प्रवास; मॉडेल ते तरूण मुख्यमंत्री, संघांचे विश्वासू अन् प्रशासनावर पकड

0
45

मुंबई, दि. 26 (पीसीबी) : महाराष्ट्रात महायुतीला बहुमत मिळालं आहे. भाजप 132 जागा जिंकत मोठा पक्ष ठरला आहे. लवकरच महायुती सरकारचा शपथविधी होणार आहे. मात्र मुख्यमंत्री कोण होणार? याबाबतीची माहिती अद्यापर्यंत गुलदस्त्यात आहे. दिल्लीत देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे. काही वेळा आधी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे राजभवनावर गेले होते. तेव्हा एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे नव्या मंत्रिमंडळाच्या शपथविधीकडे सर्वांच्या नजरा आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राज्याची धुरा गेली तर ते दुसऱ्यांदा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून कारभार सांभाळतील.

नागपूर महापालिकेतून देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय करिअरला सुरुवात झाली. नागपूर महापालिकेत नगरसेवक म्हणून त्यांनी राजकीय जीवनात पाय रोवले. अवघ्या 22 व्या वर्षी ते नगरसेवक झाले होते. मग सर्वात तरूण महापौर असल्याची नोंद फडणवीसांच्या नावावर आहे. नंतर ते नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे ते आमदार झाले. भाजपचं प्रदेशाध्यक्षपद देखील देवेंद्र फडणवीस यांनी सांभाळलं आहे. 2014 ला अवघ्या 44 व्या वर्षी ते पहिल्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. कमी वयात मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे शरद पवारांनंतर ते दुसरे नेते ठरले. 2019 ला महाविकास सरकारच्या काळात त्यांनी विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी देखील सांभाळली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी 2014 ला मुख्यमंत्रिपदाची धुरा सांभाळली आहे. तसंच 2022 पासून त्यांनी उपमुख्यमंत्रिपद आणि गृहमंत्री म्हणून काम केलं आहे. त्यांची प्रशासनावर पकड आहे. भाजपच्या राजकीय वाटचालीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची महत्वाची भूमिका आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विश्वासू नेत्यांच्या यादीत देवेंद्र फडणवीस यांचा नंबर वरचा आहे. शिवाय प्रशासनाचा अनुभव असल्याने मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत देवेंद्र फडणवीस वरचढ ठरतात. देवेंद्र फडणवीस यांची पर्सनॅलिटी पाहून त्यांचे बालपणीचे मुख्यमंत्री विवेक रानडे यांनी मॉडेलिंग करण्याचा सल्ला दिला. देवेंद्र फडणवीसही त्यासाठी तयार झाले. 2006 ला त्यांनी नागपुरातील एका कपड्याच्या दुकानासाठी फोटोशूट केलं होतं.