देवेंद्र फडणवीस त्याचं धरणातलं पाणी तीर्थ म्हणून पीत पवित्र झाले

0
323

पिंपरी, दि. १ (पीसीबी) – सुषमा अंधारे यांनी अजितदांदांच्या धरणावर बोलणारे देवेंद्र फडणवीस त्याचं धरणातलं पाणी तीर्थ म्हणून पीत पवित्र झाले असल्याची जळजळीत टीका ठाकरे गटाच्या नेत्या केली आहे. पुण्यातील पिंपरी चिंचवडमध्ये आयोजित कार्यक्रमात सुषमा अंधारे बोलत होत्या. यावेळी सुषमा अंधारेंनी उपमुख्यमंत्री अजित पवारांसह देवेंद्र फडणवीसांवर जोरदार हल्लाबोल चढवला आहे.

सुषमा अंधारे म्हणाल्या, देवेंद्र फडणवीस आज काय बोलताहेत, तुम्हाला शोभतंय का? कालपर्यंत 70 हजार कोटींच्या सिंचनाच्या घोटाळ्याचा आरोप तुम्ही अजितदादांवर केला होता. एकेकाही तुम्ही अजितदादांच्या धरणाच्या विधानावर बोलत होतात. आज तुम्ही त्याचं धरणातलं पाणी तीर्थ म्हणून पीत पवित्र झाला आहात, अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली आहे.

दरम्यान, शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिंदेंनी भाजपसोबत जात सत्ता स्थापन केली. त्यानंतर आंबेडकरी चळवळीमधील कार्यकर्त्या सुषमा अंधारे यांनी मातोश्री गाठत उद्धव ठाकरेंकडून शिवबंधन बांधलं होतं. एकीकडे सत्तासंघर्षाची सुनावणी सुरु असतानाच दुसरीकडे ठाकरे गटाची मुलुख मैदानी तोफ बनून महाप्रबोधन यात्रेतून सुषमा अंधारे शिंदे गटासह भाजपवर टीकेची तोफ डागत असल्याचं पाहायला मिळालं होतं.

त्यानंतर आता महाविकास आघाडीतील सर्वात मोठा पक्ष मानला जाणाऱ्या राष्ट्रवादीचा मोठा गट शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामिल झाल्याने राजकीय भूकंपच झाल्याचं मानलं गेलं. राष्ट्रवादीमधील अजित पवार यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामिल झाले. एवढंच नाहीतर अजित पवारांसह समर्थकांनी मंत्रिपदाचीही शपथ घेतली.
सत्तासंघर्षाच्या सुनावणीनंतर आता पुन्हा एकदा सुषमा अंधारेंनी सत्ताधारी सरकारवर सडकून टीका करत असल्याचं दिसून येत आहेत. देवेंद्र फडणवीसावर जळजळीत टीका केल्यानंतर आता सुषमा अंधारेंच्या टीकेवर फडणवीस काय बोलणार? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.