देवेंद्र फडणवीस करोना पॉझिटिव्ह…

0
248

मुंबई,दि.०५(पीसीबी) – राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना करोनाची लागण झाली आहे. त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ही माहिती दिली आहे. मला करोनाची लागण झाली असून मी गृह विलगीकरणात असल्याचं त्यांनी या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. गेल्या काही दिवसांमध्ये राज्यात करोनाबाधितांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून नागरिकांना सतर्कतेचं आवाहन करण्यात आलं आहे. त्यात राजकीय नेतेमंडळींनाही करोनाची लागण झाल्याचं समोर येऊ लागलं आहे.

काही दिवसांपूर्वीच काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि सरचिटणीस प्रियंका गांधी यांना करोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर आता राज्यात देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करून आपल्याला करोनाची लागण झाल्याची माहिती दिली आहे.