देवेंद्र फडणवीसांच्या पहिल्याच भाषणातील टॉप 10 मुद्दे

0
7

मुंबई, दि. 04 (पीसीबी) : विधिमंडळ पक्षनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड करण्यात आली. भाजपाच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत आमदारांनी देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळ गटनेतेपदी एकमताने निवड केली. या सर्व निवड प्रक्रियेनंतर आता देवेंद्र फडणवीस हेच राज्याचे नवे मुख्यमंत्री होणार हे आता स्पष्ट झाले आहे. देवेंद्र फडणवीसांची विधिमंडळ गटनेतेपदी निवड झाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी सगळ्यांचे आभार मानले. एकमताने माझी विधिमंडळ गटनेतापदी निवड केली. यावेळची निवडणूक अतिशय ऐतिहासिक होती. एक है तो सेफ है हे या निवडणुकीच्या निकालानं स्पष्ट केलं. तर मोदी है तो मुमकीन है हे लोकसभेच्या निकालानंतर स्पष्ट झालं, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड झाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांचं पहिलं भाषण, काय काय म्हणाले?, टॉप 10 मुद्दे
1. सगळ्यांचे आभार की एकमताने माझी विधीमंडळ गटनेतापदी निवड केली…
2. यावेळची निवडणूक अतिशय ऐतिहासिक…
3. एक है तो सेफ है हे या निवडणुकीच्या निकालानं स्पष्ट केलं.
4. मोदी है तो मुमकीन है हे लोकसभेच्या निकालानंतर स्पष्ट झालं.
5. महाराष्ट्राच्या जनतेनं जे बहुमत दिलं आहे त्याकरता मी जनतेला साष्टांग दंडवत घालतो.
6. इथं मनानं उपस्थित असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांचे आभार मानतो.
7. ज्या प्रक्रियेनं आपण निवडून येतो त्या संविधानाची 75 वर्षं पूर्ण होतायत म्हणून हे महत्वाचं आहे.
8. माझ्याकरता भारताचं संविधान सगळ्यात महत्वाचं..प्रत्येकाला जगण्याचा अधिकार दिला.
9. राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीवर्षी मी त्यांना नमन करतो…
10. भगवान बिरसाामुंडा यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त त्यांना वंदन…
11. आपले सगळ्यांचे लाडके श्रद्धेय अटलबिहारी वाजपेयी यांना नमन करतो.
12. आपली प्राथमिकता आपण सुरू केलेली योजना आणि महाराष्ट्राला सर्व आघाड्यांवर पुढे नेण्याकरता आपण कार्यरत राहू…
13. 2019 साली जनतेचा कौल आपल्याला मिळाला होता, दुर्दैवानं तो कौल हिसकावून घेत जनतेशी बेईमानी केली होती.
14. सुरूवातीच्या अडीच वर्षांच्या काळात राज्यात आपल्या आमदांराना त्रास दिला गेला तरीही एकही आमदार आपल्याला सोडून गेला नाही…
15. माननीय मोदीजींचे मी आभार मानतो, की त्यांनी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदी बसवलं
16. आपल्याला कुणीतरी मोठं करावं म्हणून आपण राजकारणात आलो नाही…
17. लार्जर इंटरेस्टमधे आपण एकत्र काम करू…कधीतरी काही गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होतात, काही मनाविरूद्ध होतात तरीही लार्जर इंटरेस्टमधे आपण सगळ्याशी जुळवून घेऊ…