देवेंद्र फडणवीसांचा दुसरा आणि मोठा गौप्यस्फोट ! राष्ट्रवादीचे ‘ते’ पत्र मीच ड्राफ्ट केले होते

0
299

मुंबई, दि.१६ (पीसीबी) : 2019 साली सत्तास्थापनेचा प्रस्ताव राष्ट्रवादीकडून आला होता. त्यावेळी आमची चर्चा अंतिम टप्प्यात आली होती. सरकार बनवण्याच्या सर्व वाटाघाटी झाल्या होत्या. कोणते खाते भाजपला द्यायचे कोणते खाते राष्ट्रवादीला द्यायचे हे ठरलं होतं. हे फक्त अजित पवार यांच्यासोबत ठरलं नव्हतं तर ते शरद पवार यांच्याशी बोलून ठरलं होतं. राष्ट्रपती राजवट लागली होती त्यावेळी राष्ट्रवादीने राज्यपालांना एक चिठ्ठी दिली होती ती चिठ्ठी देखील मीच लिहून दिली होती, असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेच्या शपथविधीबाबद एबीपी माझाच्या मुलाखतीत केला आहे.

राज्यपालांनी सुरुवातीला भाजपनंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी यांना सत्ता स्थापनेसाठी बोलवलं होते. मात्र कोणाकडेही 145 ही मॅजिक फिगर नसल्याने सत्ता स्थापन होऊ शकली नाही. राष्ट्रवादीने सत्ता स्थापन करण्यास असमर्थता दर्शवत राज्यात राष्ट्रवपती राजवट लागू करण्याची शिफारस त्या पत्रात केली होती. फडणवीस यांच्या दव्यानुसार राष्ट्रवादीने हेच ते पत्र ड्राफ्ट केले होते.

एबीपी माझाने काही वर्षापूर्वीची ऑफ द रेकॉर्ड केली मुलाखत आज प्रसिध्द केली आहे. त्यात फडणवीसांनी हा दावा केला आहे. राजकारण हे तत्वावर झालं पाहिजे अशी माझी भावना आहे. तत्वावर राजकारण करण्यासाठी आपण राजकारणात राहिलं पाहिजे हा एक नियम आहे. आम्ही ज्यावेळी निवडून आलो होतो त्यावेळी शिवसेनेसोबत सत्तास्थापनेच्या वाटाघाटी सुरु झाल्या होत्या.

पण एकवेळ असं जाणवलं की शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जाण्याच ठरवलं आहे. शिवसेनेची भूमिका समजल्यावर आम्ही देखील वेगळे पर्याय शोधायला सुरुवात केली. त्यामध्ये जवळजवळ दहा ते बरा दिवस गेले होते. आम्ही तर काँग्रेससोबत जाऊ शकत नव्हतो. त्यावेळी आम्ही राष्ट्रवादीसोबत चर्चेला सुरुवात केली, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.