देवेंद्रजी शिंदेंना वेशांतर करून भेटायचे – अमृता फडणवीस

0
281

मुंबई – मागील १५ दिवसांच्या अनेक धक्कादायक घडामोडींनंतर राज्यात शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गट आणि भाजपने सत्तांतर घडवून आणत सरकार स्थापन केलं. मात्र हे सत्तांतर काही एक दिवसांत झालेलं नाही. याबाबत आता नवनवीन खुलासे होत असून खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेतील भाषणात हे कसं घडल याची पुसटशी कल्पना दिली होती. आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी सत्तास्थापनेपूर्वीच्या एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटींविषयी मोठा गौप्यस्फोट केला आहे.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या एक्सक्लुजिव्ह मुलाखतीत अमृता फडणवीस म्हणाल्या की, एकनाथ शिंदे यांना भेटायला जाण्यासाठी देवेंद्रजी वेशांतर करून जायचे. शिवाय देवेंद्रजी मुख्यमंत्री होणार नाहीत, हे देखील आपल्याला आधीच माहित होतं, असंही त्यांनी म्हटलं.

याआधी एकनाथ शिंदे यांनी देखील सभागृहातील बहुमत चाचणीनंतर केलेल्या दिलखुलास भाषणात सरकार स्थापनेसंदर्भातील अनेक गुपित गोष्टींचा उलगडा केला होता. शिंदे म्हणाले होते की, मी आणि देवेंद्र फडणवीस अंधार झाल्यावर भेटायचो. त्याचवेळी सत्तांतर काही एका दिवसात झालं नाही असंही ते म्हणाले होते.