देवाच्या आळंदीत घरफोडी

0
181

आळंदी, दि.२९ (पीसीबी) – देवाच्या आळंदीत चोरट्यांनी घरफोडी करून रोख रक्कम आणि वारकरी शिक्षण संस्थेची कागदपत्रे चोरून नेली. ही घटना रविवारी (दि. 26) पहाटे जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेच्या पाठीमागे आळंदी येथे उघडकीस आली.

संतोष रामदास सुंबे (वय 35, रा. आळंदी. मूळ रा. अहमदनगर) यांनी याप्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या घराचा कडी कोयंडा तोडून अज्ञात चोरट्याने घरातील लोखंडी कपाटात ठेवलेले फिर्यादी यांचे व त्यांच्या विद्यार्थ्यांचे 47 हजार 500 रुपये रोख रक्कम आणि वारकरी शिक्षण संस्थेचे व इतर संस्थेचे कागदपत्र चोरून नेले. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.