देवदर्शनासाठी निघालेल्या महिलेची बस प्रवासात पर्स चोरीला

0
328

निगडी, दि. २५ (पीसीबी) – देवदर्शनासाठी पीएमपीएमएल बसने प्रवास करणाऱ्या महिलेची पर्स प्रवासात चोरीला गेली. पर्समध्ये 44 हजार 550 रुपयांचा ऐवज चोरीला गेली.हि घटना मंगळवारी (दि.24) निगडी-लोणावळा बसमध्ये घडली.

महिलेने याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या वाघजाई देवीच्या दर्शनासाठी निगडी-लोणावळा बसने जात होत्या. यावेळी गर्दीचा फायदा घेऊन चोराने फिर्यादीच्या पर्समधील 1 तोळे वजनांची 40 हजार 500 रुपयांची सोन्याची साखळी, 4 हजार 500 रुपये रोख असा एकूण 40 हजार 500 रुपयांचा एवज चोरीला गेला आहे. यावरून निगडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.