दुसऱ्या व्यक्तीवर गोळीबार करून स्वत: केली आत्महत्या

0
801

बाणेर, दि. १० (पीसीबी) – औंध येथून मोठी बातमी समोर येत आहे. औंध येथे एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीवर गोळ्या झाडल्या असून स्वत: ही गोळी झाडत आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. यामध्ये आरोपीचा मृत्यू झाला आहे. पैशाच्या वादातून हा हल्ला करण्यात आला आहे. औंध येथील ज्युपिटर हॉस्पिटल जवळ हा प्रकार घडला. आरोपी अनिल ढमाले हा पोलिस स्टेशनला जात असतानाच त्याने रिक्षात स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्या केली.

अनिल सखाराम ढमाले (वय 52, रा. बालेवाडी) असे आत्महत्या केलेल्या सराफ व्यवसायिकाचे नाव आहे. आकाश गजानन जाधव (वय 3*, रा. बाणेर) असे जखमी झालेल्या दुकानमालकाचे नाव आहे.

सविस्तर माहिती अशी, की बाणेर येथील हाय स्ट्रीटवर आकाश यांची सुवर्ण पेढी गेली 14 वर्षे ढमाले हे अनिल ज्वेलर्स म्हणून चालवत होते. व्यावसायिक कारणाने ढमालेने आकाशकडून उसने पैसे घेतले होते. आकाश अनिलकडे सतत पैसे मागत असल्याने गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्यात आर्थिक वाद सुरु होता. या त्रासाला कंटाळून त्याने हा हल्ला केल्याचे अनिल याने पत्रात लिहिले आहे.