दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्याचे परीक्षा शुल्क माफ करण्याबाबत तात्काळ अंमलबजावणी करावी

0
141
  • डॉ. नीलम गो-हे यांचे निर्देशाची डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाकडून पुर्तता
  • अनेक विद्यार्थ्यांना लाभ

मुंबई दि.20 (पीसीबी): राज्य शासनाने शासन निर्णयांव्दारे दुष्काळी तालुके जाहीर केलेले आहे. तसेच अनेक महसूल मंडळामध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर केली आहे. या निर्णयानुसार दुष्काळग्रस्त भागात शालेय / महाविदयालयीन परीक्षा शुल्क सवलतीस मंजुरी दिली आहे. दिनांक १३ मार्च, २०२४ रोजी उप सभापती महाराष्ट्र विधान परिषद, डॉ. नीलम गोऱ्हे यांनी संभाजीनगर महसूल विभागात दुष्काळाविषयी आढावा घेतला. यावेळी डॉ. गोऱ्हे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विदयापीठात दुष्काळग्रस्त भागातील शालेय व महाविदयालयातील विदयार्थाच्या परीक्षा शुल्क माफ करण्याबाबत निर्देश दिले. तसेच याबाबत तात्काळ कार्यवाही करावी असे सुचित केले . या संदर्भात केलेल्या कार्यवाहीचा अहवाल मागितला होता.

यास अनुसरुन संचालक परीक्षा व मुल्य मापन मंडळ डॉ. बाबसाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ यांनी ज्या विदयार्थानी परीक्षा आवेदन सादर केले आहे व शासन निर्णयानुसार परीक्षा शुल्क माफीसाठी पात्र आहे. अशा पात्र विदयार्थ्याची माहिती अधिनिस्त सर्व प्राचार्य / संचालय महाविदयालय / परीसंस्था यांच्याकडून मागविले आहे व कोणत्याची परिस्थितीत दुष्काळ सदृश्य तालुक्यातील पात्र विदयार्थी सदर योजनेपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी असे कळविले आहे. यामुळे दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्याना मोठा दिलासा मिळणार आहे .या बद्दल अनेक विद्यार्थी व स्वयंसेवी संस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.