दुर्गा टेकडीवर नेऊन अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी

0
93

मुलगी दोन महिन्यांची गरोदर राहिल्यानंतर प्रकार उघड

निगडी, दि. ३० ऑगस्ट (पीसीबी) – निगडी मधील दुर्गा टेकडीवर नेऊन 15 वर्षीय मुलीवर एका तरुणाने लैंगिक अत्याचार केला. यासाठी पिडीत मुलीच्या 15 वर्षीय मैत्रिणीने आरोपी तरुणाला मदत केली. घडल्या प्रकरणाची वाच्यता केल्यास ठार मारण्याची धमकी दिल्याने मुलीने कोणास काही सांगितले नाही. मात्र पिडीत मुलगी दोन महिन्यांची गरोदर राहिल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. ही घटना 5 जुलै ते 9 ऑगस्ट या कालावधीत घडली.

याप्रकरणी पिडीत 15 वर्षीय तरुणीच्या 35 वर्षीय आईने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सलीम (वय 22 ते 25 वर्ष, रा. ओटास्कीम, निगडी) आणि 15 वर्षीय मुलीच्या विरोधात बाल लैंगिक अत्याचारासह अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत मुलगी घरात एकटी असताना तिच्यावर अत्याचार करण्याच्या उद्देशाने ‘तू माझ्यासोबत दुर्गा टेकडी येथे चल. नाहीतर तुला व तुझ्या कुटुंबाला जीवे मारून कुटुंब संपवून टाकीन’ अशी सलीम याने धमकी दिली. तिला बळजबरीने दुर्गा टेकडी येथे नेले. तिथे काही अंतरावर पिडीत मुलीची 15 वर्षी वर्ग मैत्रीण थांबली. सलीम याने मुलीवर तीन वेळा लैंगिक अत्यचार केला.

15 वर्षीय वर्ग मैत्रिणीने पिडीत मुलीला यासाठी भाग पाडले. सलीम याने पिडीत मुलीला घडलेल्या प्रकाराबाबत कोणास काही सांगितल्यास गळा दाबून ठार मारण्याची धमकी दिली. त्यामुळे मुलीने कुठेही वाच्यता केली नाही. मुलगी दोन महिन्यांची गरोदर राहिल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. निगडी पोलीस तपास करीत आहेत.