दुबई ट्रिपच्या बहाण्याने सहा लाख 40 हजारांची फसवणूक

0
301

वाकड, दि. ८ (पीसीबी) – दुबई येथे फॅमिली ट्रिप अरेंज करण्याच्या बहाण्याने सहा लाख 40 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार 23 डिसेंबर 2023 ते 7 फेब्रुवारी 2024 या कालावधीत भूमकर चौक वाकड येथे घडला.

अनुप दिलीप शर्मा (वय 33, रा. भुमकर चौक, वाकड) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अमृत टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनीचे मालक महेंद्रसिंग मांड, मुलगा ऋषी मांड (दोघे रा. इंदोर, उत्तर प्रदेश) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी व त्यांच्या मित्रांना दुबई येथे फॅमिली ट्रिप अरेंज करतो असे सांगितले. त्यासाठी त्यांच्याकडून सहा लाख 40 हजार 960 रुपये घेऊन त्या बदल्यात कोणत्याही प्रकारची ट्रीप अरेंज न करता व त्यांचे पैसे परत न करता त्यांची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.