दुप्‍पट परताव्‍याचे आमिष दाखवून फसवणूक

0
115


भोसरी, दि. २० (पीसीबी) : दुप्‍पट परताव्‍याचे आमिष दाखवून एका नागरिकांची १४ लाख रुपयांची फसवणूक केली. ही घटना १० एप्रिल ते २७ मे २०२४ या कालावधीत ऑनलाइन पद्धतीने फिर्यादी यांच्‍या घरी घडली.

विजय सुरेश वाघ (वय ४०, रा. मोशी) यांनी गुरुवारी (दि. १९) याबाबत एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चार अज्ञात मोबाइल धारक व बँक खाते धारक यांच्‍या विरोधात गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, फिर्यादी यांना आरोपींनी त्‍यांच्‍या व्हॉटस्‌ॲप नंबरवर संपर्क साधून जे. पी मॉर्गन कंपनीत गुंतवणूक केल्‍यास दुप्‍पट फायदा होईल, असे अमिष दाखविले. त्‍यानंतर फिर्यादी यांना एक लिंक पाठवून खाते सुरू करण्‍यास सांगितले. या खात्‍यावर नफा होत असल्‍याचे दाखविले. फिर्यादी यांचा विश्‍वास संपादन करून १४ लाख ९ हजार रुपये भरण्‍यास भाग पाडून फसवणूक केली. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.