दुचाकी पार्क करून चारचाकी पळवली

0
383

बावधन, दि. ०४ (पीसीबी) – दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी त्यांची दुचाकी सोसायटीच्या पार्किंग मध्ये पार्क केली. त्यानंतर पार्किंग मधून चारचाकी पळवून नेली. ही घटना सोमवारी (दि. 2) पहाटे चार वाजताच्या सुमारास बावधन येथे घडली.

निखील प्रसाद कामत (वय 37, रा. बावधन) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी व्यक्ती आणि त्याची साथीदार महिला यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कामत यांनी त्यांची दोन लाख रुपये किमतीची सफारी डायकोर गाडी (केए 04/एमसी 8799) सोसायटीच्या पार्किंग मध्ये पार्क केली. सोमवारी पहाटे चार वाजताच्या सुमारास एका दुचाकीवरून (एमएच 15/एफबी 3084) एक व्यक्ती आणि महिला आले. त्यांनी त्यांची दुचाकी फिर्यादी यांच्या पार्किंग मध्ये पार्क केली आणि फिर्यादी यांची चारचाकी गाडी चोरून नेली. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.