दुचाकी परत न करता तरुणाची फसवणूक

0
328

निगडी, दि. ७ (पीसीबी) – विश्वासाने दिलेली दुचाकी परत न देता तरुणाची फसवणूक केली. ही घटना बुधवारी (दि. 6) सकाळी साडेनऊ वाजता प्राधिकरण निगडी येथे घडली.

कलीयाप्पान जी (वय 27, रा. प्राधिकरण निगडी. मूळ रा. तामिळनाडू) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या मित्राची पल्सर दुचाकी घेऊन प्राधिकरण निगडी येथे आले होते. तिथे एका अनोळखी व्यक्तीने त्यांचा विश्वास संपादन करून दुचाकी घेतली. ती दुचाकी घेऊन अनोळखी व्यक्ती पळून गेला. याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.