दुचाकी चालवताना फोन उचलणे बेतले जीवावर

0
229

भोसरी, दि. ६ (पीसीबी) – दुचाकी चालवत असताना फोन उचलणे एका दुचाकीस्वाराच्या जीवावर घेतले. फोन उचलताना दुचाकी वरील नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला होता. त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा अपघात 22 मार्च रोजी धावडेवस्ती, भोसरी येथे घडला.

किरण नामदेव पांचाळ (वय 40, रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी) असे मृत्यू झालेल्या दुचाकी चालकाचे नाव आहे. याप्रकरणी दत्तात्रय शंकरराव पोतदार (वय 45, रा. आळंदी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पोतदार आणि त्यांचा मावस भाऊ किरण पांचाळ हे 22 मार्च रोजी रात्री आठ वाजताच्या सुमारास दुचाकीवरून चक्रपाणी वसाहत भोसरी येथे जात होते. धावडे वस्ती भोसरी येथे आल्यानंतर किरण यांना फोन आला. त्यामुळे त्यांनी शर्टच्या वरच्या खिशातून मोबाईल काढण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी त्यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि दुचाकीचा अपघात झाला. त्यामध्ये किरण हे गंभीर जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.