दुचाकी चालकाला दगडाने मारहाण; कार चालकावर गुन्हा दाखल

0
258

हिंजवडी, दि. १० (पीसीबी) – कार चालकाने दुचाकीला धक्का दिला. त्यांनतर दुचाकी चालकाला दगडाने मारहाण केली. ही घटना शुक्रवारी (दि. 8) रात्री साडेसात वाजता आदर्शनगर हिंजवडी येथे घडली.

भगवान विठ्ठल साखरे (वय 41, रा. आदर्शनगर, हिंजवडी) याला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी उल्हासराव शरदराव देशमुख (वय 50, रा. आदर्शनगर, हिंजवडी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या मुलासोबत दूध विक्रीचे बिल आणण्यासाठी दुचाकीवरून जात होते. त्यावेळी आरोपीने त्याच्या कारने फिर्यादी यांच्या दुचाकीला धक्का दिला. त्यात फिर्यादी यांच्या मुलाच्या पायाला दुखापत झाली. तसेच दुचाकीचे नुकसान झाले. याचा जाब विचारण्यासाठी फिर्यादी गेले असता आरोपीने दगडाने फिर्यादी यांना मारून गंभीर जखमी केले. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.