दुचाकी घसरून टेम्पोखाली आल्याने डिलिव्हरी बॉय जखमी

0
86

दि. 1 ऑगस्ट (पीसीबी) हिंजवडी,
डिलिव्हरी बॉयची दुचाकी घसरून ती एका टेम्पोच्या चाकाखाली आली. त्यामध्ये डिलिव्हरी बॉय गंभीर जखमी झाला. हा अपघात मंगळवारी (दि. 30) रात्री साडेदहा वाजता पावर हाऊस समोर, फेज दोन, हिंजवडी येथे घडला.

श्रीकृष्ण भागुजी पडुळकर (वय 35, रा. संयोगनगर, निगडी) असे जखमी डिलिव्हरी बॉयचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार टेम्पो (एमएच 14/केक्यू 0441) चालक जुनेद शेख (रा. वडगाव मावळ) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने त्याच्या ताब्यातील टेम्पो हयगयीने चालवला. दरम्यान फिर्यादी यांची दुचाकी घसरली गेल्याने ते टेम्पोच्या खाली आले. या अपघातात फिर्यादी यांच्या डाव्या पायावरून टेम्पोचे चाक गेले. यात ते गंभीर जखमी झाले. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.