दुचाकी घसरल्याने दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू

0
289

मोशी, दि.२७ (पीसीबी)- भरधाव वेगात दुचाकीवरून जात असताना दुचाकी घसरल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना 15 मे रोजी पहाटे दोन वाजताच्या सुमारास डुडुळगाव मोशी येथून देहू फाट्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर घडली.

पवन सुनील सोनसळे (वय 27, रा. मोरेवस्ती चिखली) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार संदीप कांबळे यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पवन सोनसळे हे त्यांच्या दुचाकीवरून डुडुळगाव मोशी येथून देहू फाट्याकडे जाणाऱ्या रस्त्याने जात होते. त्यांनी भरधाव वेगात दुचाकी चालवल्याने दुचाकी घसरली आणि ती रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या मिक्सरला धडकली. या अपघातात पवन हे गंभीर जखमी झाले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दिघी पोलीस तपास करीत आहेत.