दुचाकीसह रोख रक्कम जबरदस्तीने चोरली

0
669

चाकण, दि. ७ (पीसीबी) – दुचाकीवरून जाणा-या व्यक्तीला रस्त्यात अडवून त्याच्या खिशातून रोख रक्कम काढून घेतली. त्यानंतर दुचाकी देखील जबरदस्तीने चोरून नेली. ही घटना रविवारी (दि. 5) रात्री आठ वाजता चाकण-वांद्रा रोडवर आसखेड खुर्द गावच्या हद्दीत घडली.

चिंतामण सोपान पडवळ (वय 46, रा. बोरदरा, आंबेठाण, ता. खेड) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पडवळ हे चाकण-वांद्रा रोडने दुचाकीवरून जात होते. आसखेड खुर्द गावच्या हद्दीत त्यांना दोन अनोळखी व्यक्तींनी अडवले. जबरदस्तीने पडवळ यांना खाली उतरवून त्यांच्या खिशातून दोन हजार रुपये काढून घेतले. त्यानंतर ठार मारण्याची धमकी देऊन पडवळ यांची दुचाकी चोरून नेली. चाकण पोलीस तपास करीत आहेत.