दुचाकीवरील चोरट्यांनी मोबाइल हिसकावला

0
62

दि. ५ ऑगस्ट (पीसीबी) वाकड,- रस्त्यावर कारची वाट पाहात थांबलेल्या एका नागरिकाचा दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी मोबाइल हिसकावून नेला. ही घटना ताथवडे येथे रविवारी (दि. 4) पहाटे एक वाजताच्या सुमारास घडली.

सुशांत रमाकांत सुतार (वय 50, रा. ऐश्वर्यम ग्रीन्स, जगताप डेअरी, वाकड) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दुचाकीवरील दोन चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे रविवारी पहाटे एक वाजताच्या सुमारास ताथवडे येथील सर्व्हिस रोडवर ओला-उबेर कार बुक करण्यासाठी थांबले होते. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी त्यांच्या हातातील मोबाइल हिसकावून नेला. वाकड पोलीस तपास करीत आहेत.