दुचाकीला भरधाव ट्रकने धडक, रायसोनी कॉलेजच्या दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू

0
112

पुणे: नगर रस्त्यावरून पुणे स्टेशनकडे दुचाकीला भरधाव ट्रकने धडक दिल्याने दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घडना सोमवारी रात्री १०.३० वाजता घडली. यात एकाचा जागीच मृत्यू झाला. तर दुसऱ्याचा ससून रुग्णालयात उपचरादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शी व्यक्तीने दिली. आदील शेख आणि पाहद शेख दोघेही राहणार लातूर अशी मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत. तसेच हे रायसोनी कॉलेजचे विद्यार्थी आहेत. यातील आदिलचा जागीच मृत्यू झाला. तर पाहदचा मृत्यू ससून रुग्णालयात झाला. असे अपघातानंतर या दोघांना मदत करणाऱ्या खांदवे नगर येथील मोशिन पठाण याने माध्यमांना सांगितले.

पठाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, नगर रस्त्यावरील जकातनाका येथे एका ट्रकने दोन विदयार्थ्यांना उडवले. चालकाने मद्यप्राशन केले होते. अपघातानंतर चालकाने दुचाकी ८०० मीटर फरफटत नेली. आदिल आणि पाहद यांचा मित्र अफान शेख याला गावी जायचे होते. त्यामुळे ते दोघे त्याला पुणे स्टेशनला सोडवायला निघाले होते. यात अफान शेख हा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी विमान नगर पोलीसांकडे तक्रार केली आहे. असे मोशीनने सांगितले.