दुचाकीच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू

0
277

मोशी , दि. 29 – भरधाव दुचाकीच्या धडकेत एका वृद्धाचा मृत्यू झाला. हा अपघात 24 जून रोजी रात्री दहा वाजताच्या सुमारास लक्ष्मी चौक, देहू-आळंदी रोड, मोशी येथे घडला.

हसन मुलुख शेख (वय 63, रा. मोशी) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी मुलुख हसन शेख (वय 33, रा. मोशी) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात दुचाकी स्वाराच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात व्यक्तीने त्याच्या ताब्यातील दुचाकी भरधाव चालवून हसन शेख यांना धडक दिधली. त्यात त्यांचा मृत्यू झाला. अपघात झाल्यानंतर दुचाकी चालक घटनास्थळावरून पळून गेला. चिखली पोलीस तपास करीत आहेत.