दुचाकीच्या धडकेत लहान मुलगी जखमी

0
9

रावेत, दि. २१ (पीसीबी)
आजोबांसोबत नातेवाईकांना सोडविण्यासाठी आलेल्या लहान मुलीला एका दुचाकीने धडक दिली. त्यामध्ये लहान मुलगी जखमी झाली. ही घटना शनिवारी (दि. १९) सायंकाळी सेंटोसा हॉटेल समोर, रावेत येथे घडली.

सुरेश रामदास राणे (वय ७२, रा. पुनावळे) यांनी याप्रकरणी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दुचाकी चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राणे आणि त्यांची नात हे दोघे त्यांच्याकडे आलेल्या पाहुण्यांना सोडविण्यासाठी सेंटोसा हॉटेल समोर बस स्टॉपवर आले होते. बस स्टॉपवर थांबले असताना एक दुचाकीस्वार भरधाव वेगात आला. त्याने राणे यांच्या नातीला जोरात धडक दिली. त्यामध्ये राणे यांची नात गंभीर जखमी झाली. रावेत पोलीस तपास करीत आहेत.