दुचाकीच्या धडकेत महिला जखमी

0
18

दिघी दि. 6 (पीसीबी) – रस्ता ओलांडत असलेल्या महिलेला दुचाकीने धडक दिली. त्यामध्ये महिला गंभीर जखमी झाली. ही घटना २७ डिसेंबर रोजी जकात नाका, दिघी येथे घडली.

याप्रकरणी ३९ वर्षीय महिलेने रविवारी (दि. ५) दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मयूर सुरेश वैष्णव (वय २९, रा. आळंदी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची आई दिघी जकात नाका येथे आळंदी-पुणे रस्ता पायी ओलांडत होत्या. त्यावेळी भरधाव वेगात आलेल्या एका दुचाकीने त्यांना जोरात धडक दिली. यामध्ये फिर्यादी यांच्या आईच्या पायाला गंभीर दुखापत झाली. दिघी पोलीस तपास करीत आहेत.