दुचाकीच्या धडकेत महिला गंभीर जखमी

0
308

पिंपरी, दि. ६ (पीसीबी) – भरधाव वेगात जाणाऱ्या दुचाकीच्या चालकाचे दुचाकी वरील नियंत्रण सुटल्याने त्याने पादाचारी महिलेला धडक दिली. यामध्ये महिला गंभीर जखमी झाली. हा अपघात सोमवारी (दि. 3) सायंकाळी सात वाजता जुना पुणे मुंबई महामार्गावर पिंपरी येथे घडला.

शंकर प्रकाश कांबळे (वय 19, रा. मोरवाडी पिंपरी) असे गुन्हा दाखल झालेल्या दुचाकी स्वाराचे नाव आहे. या प्रकरणी जखमी महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला जुना पुणे मुंबई महामार्गावरून पायी चालत जात होत्या. त्यावेळी भरधाव वेगात आलेल्या दुचाकीने फिर्यादी यांना धडक दिली. त्यामध्ये फिर्यादी गंभीर जखमी झाल्या आहेत. दुचाकीस्वाराने हयगयीने दुचाकी चालाविल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.