दुचाकीच्या धडकेत पोलीस हवालदार जखमी

0
131

दि २० मे (पीसीबी ) – भरदार दुचाकी चालव दुचाकी चोराने कर्तव्यावर असलेल्या पोलीस हवालदाराला धडक देत जखमी केले आहे ह अपघात रविवारी (दि.19) हिंजवडी येथील टाटा टी जंक्शन येथे घडला.

याप्रकरणी पोलीस शिपाई सखाराम पोले यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली आहे. फिर्यादीवरून अरनव उत्तमदे (वय 26 रा. दत्तवाडी) पुणे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाहतूक विभागातील पोलीस हवालदार पोटे हे टाटा टी जंक्शनवर आपले कर्तव्य बजावत होते. यावेळी आरोपी या दुचाकीवरून भरधाव वेगात आला. यावेळी पोटे यांनी त्याला थांबण्याचा इशारा केला असताना देखील तिकडे दुर्लक्ष करत त्याने थेट पोलीस हवालदार पोटे यांना धडक दिली. यात पोटे यांना जखमी केले आहे. यावरून हिंजवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.