दुचाकीच्या धडकेत पादचारी व्यक्ती गंभीर जखमी

0
166

चाकण, दि. १२ (पीसीबी)-रस्त्याने पायी चालत जाणाऱ्या व्यक्तीला एका दुचाकीस्वाराने धडक दिली. यामध्ये पादचारी व्यक्ती गंभीर जखमी झाला. हा अपघात 8 जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता चाकण-वराळे रस्त्यावर वराळे येथे घडला.

बबन भागोजी सावंत असे जखमी झालेल्या पादचारी व्यक्तीचे नाव आहे. बबन यांच्या पत्नीने याप्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार भूमेश्वर गुलाब वाळके (वय 22, रा. भंडारा) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे पती बबन हे चाकण-वराळे रस्त्याने पायी चालत जात होते. त्यावेळी भरधाव वेगात आलेल्या एका दुचाकीने त्यांना जोरात धडक दिली. या अपघातात बबन यांच्या तोंडाला दुखापत होऊन जबडा फ्रॅक्चर झाला. दात पडले. बरगडी, कमरेला आणि पायाला गंभीर दुखापत झाली. तसेच दुचाकीस्वार देखील जखमी झाला आहे. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.