दुचाकीच्या धडकेत पादचारी महिला जखमी

0
264

हिंजवडी, दि. १७ (पीसीबी) – रस्त्याने पायी जाणाऱ्या महिलेला दुचाकीस्वाराने धडक दिली. यात महिलेचा पाय फ्रॅक्चर झाला. ही घटना शुक्रवारी (दि. 16) सकाळी वाकड ब्रिज जवळ, हिंजवडी येथे घडली.

तुषार लक्ष्मण जाधव असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी जखमी महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला शुक्रवारी सकाळी सात वाजता वाकड ब्रिज येथून रस्त्याने पायी चालत कामावर जात होत्या. त्यावेळी आरोपी दुचाकीवरून आला. त्याने फिर्यादी महिलेला दुचाकीची धडक दिली. त्यात फिर्यादी महिलेच्या पायाला फ्रॅक्चर झाले. तसेच हाताला व इतर ठिकाणी मुकामार लागला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.