दुचाकीच्या धडकेत तरुण जखमी

0
173

पिंपरी दि. २९ (पीसीबी) – पायी जाणा-या तरुणाला भरधाव दुचाकीने धडक दिली. त्यामध्ये तरुण जखमी झाला. ही घटना शनिवारी (दि. 27) रात्री सात वाजता आंबी, मावळ येथे घडली.

रजनीश यज्ञनारायण केवट (वय 25, रा. आंबी, ता. मावळ. मूळ रा. मध्य प्रदेश) असे जखमी तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एमएच 14/एचजे 3961 क्रमांकाच्या दुचाकी चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आंबी येथे आंबी सर्कलकडून तळेगाव एमआयडीसी रोडने जात असताना रस्ता ओलांडताना एका दुचाकीने त्यांना धडक दिली. त्यामध्ये रजनीश जखमी झाले. अपघात झाल्यानंतर दुचाकीस्वार घटनास्थळी न थांबता पळून गेला. तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.