दुचाकीच्या धडकेत एकाचा मृत्यू

0
343

चाकण, दि. २४ (पीसीबी) – रस्ता ओलांडणाऱ्या व्यक्तीला भरधाव वेगात जाणाऱ्या दुचाकीने धडक दिली. त्यात पादचारी व्यक्तीचा मृत्यू झाला. हा अपघात शनिवारी (दि. 22) रात्री साडेनऊ वाजता पुणे-नाशिक महामार्गावर चिंबळी फाटा येथे घडला.

आप्पा कासीम नदाफ (वय 45, रा. जाधववाडी, चिखली) यांनी याप्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात दुचाकी चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा लहान भाऊ पुणे-नाशिक महामार्गावर चिंबळी फाटा येथे रस्ता ओलांडत होता. त्यावेळी भरधाव वेगात जाणाऱ्या एका दुचाकीने त्यांना धडक दिली. त्यात गंभीर जखमी झाल्याने त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अपघात झाल्यानंतर दुचाकी चालक घटनेची माहिती न देता घटनास्थळावरून पळून गेला. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.