दुचाकीची बसला धडक; दुचाकीस्‍वाराचा मृत्‍यू

0
61

निगडी, दि. 06 (पीसीबी) : भरधाव वेगातील दुचाकीने बसला पाठीमागून धडक दिली. या अपघातात दुचाकीस्‍वाराचा मृत्‍यू झाला. ही घटना २५ ऑक्‍टोबर रोजी रात्री पावणे अकरा वाजताच्‍या सुमारास ओटास्‍कीम, निगडी येथील चिकन चौकात घडली.

नीखिल विकास दौंड (वय २६, रा. मु. पो. घारगाव, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर) असे अपघातात मृत्‍यूमुखी पडलेल्‍या दुचाकीस्‍वाराचे नाव असून पोलिसांनी त्‍याच्‍या विरोधात गुन्‍हा दाखल केला आहे. सहायक पोलीस उपनिरीक्षक आनंद भाऊ साळवी यांनी मंगळवारी (दि. ५) निगडी पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, मयत निखिल आणि त्‍याचा मित्र शुभम राजापुरे हे (एमएच १२ जेबी ३३४०) या दुचाकीवरून भरधाव वेगात चालले होते. २५ ऑक्‍टोबर रोजी रात्री पावणे अकरा वाजताच्‍या सुमारास ते ओटास्‍कीम, निगडी येथील चिकन चौकात आले. त्‍यावेळी त्‍यांनी पिवळ्या काळ्या रंगाच्‍या बसला पाठीमागून धडक दिली. या अपघातात निखिल याचा मृत्‍यू झाला. तर सहप्रवासी शुभम राजापुरे हा गंभीर जखमी झाला. निगडी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.