दुचाकीची टेम्पोला धडक; दोघे जखमी

0
67

वाकड, दि. 21 (पीसीबी) : भरधाव दुचाकीने एका तीन चाकी टेम्पोला धडक दिली. या अपघातात टेम्पो चालक आणि दुचाकी चालक दोघेजण जखमी झाले. हा अपघात शनिवारी (दि. 19) सायंकाळी सव्वा सहा वाजताच्या सुमारास ज्योतिबा गार्डन, काळेवाडी येथे घडला.

राजशेखर सिद्रामप्पा बिराजदार (वय 43, रा. वाल्हेकरवाडी चिंचवड)यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दुचाकी चालक सुनीलकुमार राजेशकुमार बिष्णोई (वय 21, रा. बाणेर, पुणे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी बिराजदार हे त्यांचा तीन चाकी टेम्पो घेऊन काळेवाडी बीआरटी लेनने जात होते. ज्योतिबा गार्डन जवळ त्यांच्या टेम्पोला आरोपी बिष्णोई याने त्याच्या ताब्यातील दुचाकीने जोरदार धडक दिली. या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले. तसेच दोन्ही वाहन चालक जखमी झाले. वाकड पोलीस तपास करीत आहेत.