दुचाकीचा धक्का लागल्याचा जाब विचारला म्हणून……

0
89

निगडी, दि. 08 (पीसीबी) : दुचाकीचा धक्का लागल्याचा जाब विचारला म्हणून दोघांनी मिळून दोघांना बेदम मारहाण केली. ही घटना रविवारी (दि. 6) रात्री दहा वाजताच्या सुमारास यमुनानगर निगडी येथे घडली.

विशाल एकनाथ कसबे (वय 26, रा. निगडी) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सनी सूर्यवंशी, राकेश गायकवाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कसबे आणि त्यांचा मित्र दुचाकीवरून घरी जात होते. त्यावेळी त्यांच्या दुचाकीला आरोपी सनी याच्या दुचाकीचा धक्का लागला. त्याबाबत कसबे यांनी आरोपींना जाब विचारला. त्या कारणावरून आरोपींनी कसबे आणि त्यांच्या मित्राला बेदम मारहाण केली. निगडी पोलीस तपास करीत आहेत.