दुचाकीचा अपहार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा दाखल

0
196

विश्वास संपादन करून नेलेली दुचाकी परत न करता तिचा अपहार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 22 एप्रिल रोजी सकाळी आळंदी येथे घडली.

याप्रकरणी महिलेने दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार नवनाथ माने (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नवनाथ माने याने फिर्यादी यांच्या पतीचा विश्वास संपादन करून त्यांची 50 हजार रुपये किमतीची दुचाकी (एमएच 10/एएफ 6871) नेली. तिचा स्वतःच्या फायद्यासाठी अपहार करून ती परत दिली नसल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दिघी पोलीस तपास करीत आहेत.