दुचाकीचा अपहार केल्या प्रकरणी माजी कर्मचाऱ्यावर गुन्हा

0
244

कंपनीत पूर्वी काम करत असलेल्या कामगाराने विश्वासाने नेलेली दुचाकी परत न देता तिचा अपहार केला. याप्रकरणी कामगारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 14 जुलै रोजी सायंकाळी पाच वाजता मावळ तालुक्यातील सुदवडी येथे घडली.

निखील बापू चव्हाण (वय 22, रा. वडखेडी, ता. पाचोरा, जि. जळगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी अक्षय तानाजी येडगे (वय 25, रा. निगडी) यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी काम करत असलेल्या कंपनीत आरोपी पूर्वी काम करत होता. त्याला बाहेरून सामान आणण्यासाठी दुचाकी हवी असल्याने त्याने फिर्यादिंकडे त्यांची दुचाकी मागितली. फिर्यादी यांनी त्यांची 30 हजार रुपये किमतीची दुचाकी दिली. आरोपीने दुचाकी नेऊन ती फिर्यादी यांना परत न देता तिचा अपहार केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.